फुलके
साहित्य:
- १ वाटी कणीक,
- २ चमचे मोहन,
- मीठ चिमूटभर चवीप्रमाणे ,
- पाणी अंदाजाप्रमाणे,
- तेल.
कृती:
प्रथम एका परातीत कणीक घेऊन त्यांत मीठ व तेल आणि अंदाजानुसार पाणी घालून कणीक भिजवावी.
कणिक शक्यतो फार सैलही नको आणि फार घट्ट नको,पाणी एकदम घालू नये,हळू हळू अंदाज घेऊ घालावे नंतर कणिक १०-१५ मिनिटे मुरू द्या.
आता बेताचा पीठाचा गोळा घेऊन पातळ पोळी लाटा. हा फुलका असल्याने या पोळीची घडी घालू नका.
नंतर ही फुलका पोळी तव्यावर टाका व जरासे भिजल्यावरती उलटवा. उलटल्यानंतर जास्त वेळ तव्यावर राहू द्यावी. खालच्या बाजूने लाल डाग पडेपर्यंत भाजल्यावर गॅसवर शेका,किंवा सरळ शेकतांना फुलक्याची कच्ची बाजू निखार्यावर येईल असा फुलका टाका.नंतर फुलक्याला जरासे तूप लावून ठेवा.
No comments:
Post a Comment