Easy Recepies

You can find very easy and quick recepies here..
.

इवलीशी स्वप्ने


इवलीशी स्वप्ने ....







         

           रीयाचा आज शाळेचा पहिलाच दिवस ,रियासाठी शाळेची बस लावली होती पण प्रांजल रियाला सोडायला  पहिल्या दिवशी स्वतःच आली. रिया खूप खुश होती नवीन कपडे ,नवीन दप्तर, नवीन शाळा सगळंच कस नवीन आणि आवडीचं होत.तस रियाला नुकतेच रांगायला यायला लागल्यापासून पुस्तकांची भारी ओढ होती. 
            काही कळत नसले तरी तासनतास पुस्तक उघडून इवल्याशा हातांनी चाळत बसायची. कोणी पुस्तक काढून घेतले तरी इवलेसे डोळे मोठे करून बघायची आणि दम भरायची. जोपर्यंत परत पुस्तक देत नाहीत तोपर्यंत ओरडायची.परत पुस्तक दिले कि स्वारी खुश होयची.त्यातले काय कळत होते तेव्हा तिला, तिची तीच जाणे ,जसे कळायला लागले तसे लवकरच बोलायला शिकली म्हणून प्रांजलनेही तिची आवड लक्षात घेऊन 
लवकरच बाराखडी, पाढे, गाणी अस शिकवायला सुरुवात केली. आताही शाळेत जाण तस नावालाच होत यातलं कितीतरी रियाला आधीपासून येत आहे म्हणा प्रांजल ने बरचस आधीच शिकवलं तिला. 
          ही चिमुकली एवढी गोड किलबिल करत होती ते पाहून प्रांजल ला तिच कौतुक वाटत होत ती रियाचा जन्मापासूनच्या आठवणींमध्ये रमून गेली तीच गोड हसण,नखरे करण,सतत बडबड करण आशा आठवणींमधून प्रांजल स्वतःच्या बालपणी मधल्या आठवणींमधे  केव्हा गेली हे तिचे तिलाच कळले नाही. प्रांजल ला तिचा शाळेचा पहिला दिवस आठवला तसे तिचे तिलाच आश्चर्य वाटले एरवी एक दिवसापूर्वीचेही कितीवेळा न आठवणारे एकदम तीस वर्षापूर्वीचे बरोबर कसे काय आठवले....आपले मन हे न उकलणारे गूढ कोडेच आहे. भूतकाळातल्या कितीतरी सहज घडलेल्या गोष्टी अगदी आताच घडून गेल्यात अशा जशाच्या तशा हलकेच मनामध्ये तरळुंन जातात.आणि काही गोष्टी घोकून घोकून पाठांतर केल्या तरी नेमक्या वेळी आपण विसरूनच जातो.अजबच आहे ना सगळे .....

            प्रांजल ला शाळेत पहिल्या दिवशी शाळेत सोडायला तीचे काका आले होते.काकांची फार लाडकी होती.पहिल्या दिवशी हट्टच करून बसली काकांबरोबरच जाणार.घरातले सगळे गोळ्या ,चॉकलेट आणि काहीबाही आमिष दाखवून कंटाळले शेवटी काकांनी सुटीच कडून घरी थांबल्यावरतीच मॅडम शांत झाल्या.काकांना घेऊन धावतच शाळेत गेली काकांना तिथेच थांबावं लागलं शाळेत शाळा सुटेपर्यंत ,प्रांजळ हळू हळू शाळेत रमत होती नवीन नवीन सगळं बगुन हरवून जात होती मधूनच मागे वळून काका आहेत कि नाही बघत होती.मागे आहेत याची खात्री झाल्यावरती परत केलात रमत होती. डब्यातला खाऊ खाऊन झाला ,खेळून झाले ,गोष्टी ऐकून झाल्या आणि शाळा सुटली घरी जायची वेळ झाली मग काका नजरेला कुठे दिसेनात ते बघून कवरीबावरी झाली. आणि नंतर एका कोपऱ्यात काकांना उभे राहिलेले पाहून हसत पळतच गेली त्यानंचाकडे.उडया मारतच घरी आली.काकांना मात्र ३-४ दिवस कमला दांडीच मारायला लागली कोणी दुसरे सोडायला आलेले चालतच नव्हते प्रांजलला तर काय करणार कोणी.पण हळू हळू  शाळेची सवय लागली आणि काकांना या कामातून सुटका मिळाली आणि त्यांची ऑफिसची सुटी कमी झाली तास त्यांनाही प्रांजलला शाळेत सोडायला आवडायचे पण ऑफिस सोडून जमत नव्हते. पण आता प्रांजल शाळेत रुळली.हे दिवस डोळ्यासमोरून तरळत होते आणि एकदम रियाचा हाक मारण्याची प्रांजळ भानावरती आली. शाळा जवळ आली होती आणि रियाची गाडीतून खाली उतरायची गडबड चालू होती.खाली उतरून प्रांजलने  रियाला हात धरून खाली उतरवले आणि वर्गात नेले.रिया आईचा हात सोडून धूम पाळली वर्गात आणि प्रांजलच्या डोळ्यात पाणी आले,

           इतक्या दिवसांच एकमेकींबरोबर राहणे, रियाला एकही मिनिट प्रांजलने दूर सोडले नव्हते सतत रियाचाच विचार,तीचा रुटीन प्रमाणे प्रांजलच सगळं काम जुळवणी चालायची आणि एकदम ४ तास रियाला सोडून राहायचं हे बघून प्रांजलला रडू आवरेना.कस जमवायचं आता हे कळेना तिला शाळा सुटेपर्यंत तिथेच बसून राहिली ती आणि विचार केला आपण पहिल्या दिवशी शाळेत जाताना आनंदांत होतो आईचा काही विचारही आला नाही तिने कस केलं असेल सगळं आणि आता मुलगी जात आहे शाळेत तर किती रडायला येत आहे. आता प्रांजल ला आईचे बोल आठवले.काही झाले कि आईला म्हणायचे कि काहीतरीच असत ग तुझं आई आणि उडवून लावायची आईच बोलनं आणि मग आईचा नेहमीच एकच डायलॉग असायचा अग आई झाल्यावरती कळेल तुला माझं काय होत ते.आता सगळं पटत होत आईने बोललेलं थोडा वेळ तीच तिलाच हसायला आलं,थोडा वेळाने प्रांजळ शांत झाली मग जरा डोकावून आली वर्गात,रिया रॅली होती नवीन वातावरणात बाहेर मात्र प्रांजळ ची घालमेल चालली होती.या सगळ्यात शाळा ससूटायची वेळ झाली तसे हायसे वाटले तिला रिया पळतपळत बाहेर आली आणि काय  काय केले ते बोबड्या बोलणी आईला सांगत होती पण प्रांजलचे मन विचारातच गुंतले होते आजचा दिवस गेला उद्यापासून काय करायचे. घरी आल्यानंतर आजी आजोबाना,कामवाल्या मावशींना,वॉचमन काकांना,शेजारच्या काकूंना भेटलेल्या ज्याला त्याला शाळेत काय केले ते अगदी पुन्हा पुन्हा आनंदाने सांगत होती रिया आणि शेवटी जेवताना एकदा बाबाना सांगून झाले आणि दमून परत उद्या शाळेत जायचे आहें म्हणून झोपली पण प्रांजलचे मन अजूनही अस्वस्थच होते तिला कळेना मुलीच्या आनंदात सहभागी व्हावं कि तिचा काळजीने तीच जग आता आपल्यापासून हळू हळू  वेगळं होणार याच सहन न होणार दुःख करत बसावं या विचारातच ती झोपून गेली.

         दुसरा दिवस उजाडला आता सकाळची गडबड चालू झाली.रियाला शाळेत सोडायची वेळ झाली. आजही कालसारखीच घालमेन झाली प्रांजलची.आणि रियाचा आनंदाला पारावर नव्हता नवीन शाळेचा,नवीन मित्रांचा,नवीन खेळण्याचा.आज मात्र प्रांजळ रियाला सोडून थांबली नाही तिथे सरळ घरीच आली पण घरी मोळक घर बगुन तीच रडू अनावर होईना.इतके दिवसांची सवय अशी एका दिवसात कशी काय  विसरून जाईल.पण लगेच तिने विचार केला अरेरे आपण हे काय करत होतो आपण आपलाच फक्त विचार केला मोठे झालो कि आधी स्वतःचा स्वार्थ बघतो आणि नंतर बाकीचे, हा क्षणिक स्वार्थ कशासाठी हे इवलस आपलं पिल्लू निरागसपणे इवलीशी निस्वार्थी स्वप्न पाहत आहे आज पिल्लू घराबाहेर पडून चालायला शिकत आहे त्याला अजून कितीतीतरी उंच झेप घेऊन उडलेल बघायचं आहे आताच असा विचार करून डगमगून कस चालेल असं म्हणून तिने मनाला कस बस आवरलं आणि कामात मन गुंतवलं.
            रियाचं शाळेतून यायची वेळ झाली अस थोडं जाड गेलं पण परत हे आता नवीन रुटीन चालू झाले आणि हळू हळू करत प्रांजलने परत रियाच्या रुटीन ला एक्सेप्ट करून तीच रुटीन अड्जस्ट केलं आणि आतुरतेने रियाची वाट बघू लागाली तिचे बोबडे बोल नवीन नवीन काय सांगत आहेत याची वाट पाहू लागली ....हेच काळाप्रमाणे ईष्ट आहे हे समजले आणि रियाच्या इवल्याश्या स्वप्नांमध्ये प्रांजलाही रमून गेली.

लेखन:
सवि रेसिपीज


No comments:

Post a Comment