Easy Recepies

You can find very easy and quick recepies here..
.

First try in kitchen.....


स्वयंपाक घरातील पहिला प्रयत्न .... 
   



   अर्चना सकाळी मेथीची भाजी चिरत होती.दररोज सकाळच्या यावेळी हेच काम चालू असे आता कसे हे सवयीचे होऊन गेले होते चिरता चिरता तिला एकदम तिच्या पहिल्या प्रयत्नांची आठवण झाली आणि स्वतःशीच हसली ती बाजूलाच सासूबाई उभ्या होत्या त्या म्हणाल्या काय ग झालं असं एकटाच हसायला. अर्चनाने काही नाही झालं असं म्हंटल आणि आपलं काम करू लागली  हसायचं थांबली पण मनाला कधी थांबवता येते का असं ते वाऱ्याच्या वेगाने फिरताच राहते इकडून तिकडे. 



   जरी माणसाला बंधन असले तरी मनाला नाही कुठले बंधन घालता येत. ते कोणाची पर्वा न करता बिनधास्त ऐटीत फिरते.अर्चनाचे तेच झाले तिचे मन काही थांबले नाही ते तिच्या गोड आठवणीत फिरताच राहिले.अर्चनाची आई शाळेत शिकवायला जायची.त्यामुळे अर्चनाला जरा लवकरच स्वयंपाकाची जबाबदारी घ्यावी लागली होती.तास आईने कधी ती असताना काही करून दिले नाही पण आई कामात असताना भूक लागली कि अर्चना आईला त्रास द्यायला नको म्हणून मनानेच स्वयंपाक घरात जाऊन काहीबाही प्रयत्न करायची. अर्चना आणि तिचा छोटा भाऊ राम दोघे इतरवेळेस समोर आले कि भांडायचे पण आईचे काम असेल कि असे दोघांचे सामोपचाराने चालायचे सगळे दोघेही समजूतदार होते तसे ,सुरुवातीला चहा,नूडल्स  असे सोप्पे सोप्पे प्रकार चालायचे पण हळू हळू आईने घरातच शिकवणी घेणे चालू केले त्यामुळे या दोघांचा कल जेवण बनवण्याकडे सरकू लागला.बहीणभाऊ एकदमच शिकली जेवण बनवायला आणि त्यामुळे अर्चनाकडे खूप गमतीजमती होत्या स्वयंपाक घरातील.



   आर्चनाचे घर तसे फार जुन्या वळणाचे नव्हते त्यामुळे तिचे बाबाही अधून मधून दोघांना मदत करायचे.बाकी काही आडले तर आई असायची सांगायला अधूनमधून पण नसेल तिला वेळ तर हे दोघे आपल्याच कालच्या चुकीतून नवीन शिकायचे आणि पुढे जायचे .



   सगळ्यात पहिले बहीणभावंडानी जेवणात मेथीची भाजी आणि चपाती असा बेत ठरवलेला.या वेळेस बाबाही कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आईलाही परीक्षा असल्यामुळे खूप काम होते त्यामुळे आईला तर नको म्हणून दोघं अंदाजेच चालू केले पहिले भाजी केली. भाजी करताना तीची पाने जरा मोठी वाटू लागली दोघांना आता कळेना आपण एवढी बारी भाजी कशी खातो मग आता दोघांनी डोकं चळवळ किभाजी चिरायची. ती एवढी बारीक चिरली कि परततल्यानंतर भाजीत फक्त लसूण आणि मिरचीचं दिसू लागली.घरात खेळीमेळीचे वातावरण असल्यामुळे हसत रमत गंमत मुलांचे काम चाले होते आता या मुलांना काही कळेना काय करावे तसाच बाजूला झाकून आणि कणिक मळायला घेतली ,डबा वरती कपाटावरती होता खाली काढताना डबा पडला  सगळ्या घरभर पीठ झालं.दोघांची नुसती हसून पुरेवाट झाली राहिलेल्या पीठ कडून घेतल डब्यातून आणि आता प्रमाण कुठे माहित आहे एवढं पाणी ओतलं कि परातीतून बाहेर यायला लागलं.पण आता मूल घाबरली आई बाबा आले कि ओरडतील म्हणून मग साफसफाई करायला चालू केली. 



   इतक्यात आई बाबा दोघेही आले दोन मिनिट त्यांना हा घराचा अवतार बघून काय  बोलावे तेच कळेना. मुलेही घाबरली एवढासा तोंड करूनकोपऱ्यात जाऊन उभ राहिली आता पण आई बाबानी दोघांना जवळ घेतले आणि प्रमाणे बाबा म्हणाले 'काय करून ठेवली आहे घराची अवस्था कुठं काही लागलं असत तुम्हाला तर केव्हढ्यावरती पडलं असत हे, एवढी काळजी करत जाऊ नका मी काम झाल्यावरती जेवण बनवत असते मला नाही त्रास होत काही परत आम्हा दोघांपैकी कोणी एक असल्याशिवाय असे काही प्रयोग करायचे नाहीत तुम्ही.'



  आईने आवराआवरी केली आणि टेबला खाली लपवलेली भाजी आणि कणिक बाहेर काढली.भाजी टेस्ट करून बघितली आणि म्हणाली 'हम्म... भाजी तशी बरी झाली आहे जेवणात घेऊ शकतो आता मला आज परत भाजी करायची गरज नाही  पण पुढच्यावेळेस ती जरा पाने मोठीच राहुद्यात म्हणजे अजून छान होईल. पण या कणकेचा काही नाही होऊ शकत, पाण्यात पोहत आहे हे पीठ आणि बाकीचे सांडून वाया गेले.आता आमटी भात करते लवकर मग जेऊ सगळे.पळा आता खेळायला '.



 अर्चना आणि राम दोघे खुदु  खुदु हसत बाहेर खेळायला गेले. थोडा वेळाने आईने हाक मारून दोघांना जेवायला बोलावले. बाबा म्हणाले 'अरे वा आज काई मस्त बेत आहे आपल्या मुलांनी बनवलेली भाजी खायला मिळणार आज ' आणि तोंडात घास घेतला आणि थोडं थांबून खाल्ला.मुलांना भारी वाटलं बाबा बोलले ते.ते घास संपवेपर्यंत मूल बाबांकडे बघत बसली. आई म्हणाली आरे चला चालू करा तुम्हिहि.अर्चना आणि रामने एक एक घास खाल्ला आणि बाबा पुढचं वाक्य म्हणाले 'जरा गोडच झाली आहे आज भाजी ना '.तसे सगळेच हसायला लागले भाजीत मिठचं मीठ झाले होते. दोघांनी जवळजवळ अर्धी बरणी रिकामी केली होती भाजीमध्ये आस म्हणायला हरकत नाही.आज अर्चना आणि रामने मिठाचीच भाजी केलेली ....



आशा भरपूर गंमतीजंमतीचा साथ होता आर्चनाकडे ती मनात म्हणाली 'आपली पहिली भाजी आठ्वली आहे आज आणि आता केवढी अचूक माप बसले आहे जरा इकडचे तिकडे होत नाही प्रमाण,शेवटी सगळं सवय आणि अंदाजच भाग झालं आहे पण आज ती गम्मत नाही जी या आठवणींमधे आहे.. दर वेळेस काहींना काही गमतीजमती आहेतच प्रत्येक कामाच्या आठवणींमध्ये साठलेल्या'.. आणि ती पुढच्या कामाला लागली..आणि मन पुढच्या आठवणींमध्ये गुंतले.. 





No comments:

Post a Comment